प्रिय मित्रांनो
मराठी साहित्यात आपला ठसा उमटवू इच्छिणाऱ्या नव्या लेखकांचे मनःपूर्वक स्वागत! प्रत्येक कथा, कविता, लेख किंवा अनुभव — हे सर्व मराठी भाषेच्या समृद्ध प्रवाहाला नवे रंग देतात. आम्ही विश्वास ठेवतो की प्रत्येक लेखकाच्या अंतःकरणात एक अनोखी कहाणी दडलेली असते, फक्त तिला योग्य व्यासपीठाची गरज असते. ही नोंदणी तुमच्या त्या पहिल्या पावलाची सुरुवात ठरो — जिथून शब्दांना आपले घर मिळेल आणि वाचकांना नवे दृष्टिकोन.लेखक नोंदणीसाठी किमान एक रचना पाठवणे अनिवार्य.
नियम व अटी
१. पाठवलेली रचना युनिकोड मराठी फॉन्टमध्ये असावी.
२. अर्ज एकदाच देणे — एकच नोंदणी अर्ज पुरावा.
३. सामग्रीची चोरी किंवा कॉपी केलेली स्वरूप स्वीकारली जाणार नाही; तपासणी नंतरच प्रकाशित.
४. अर्जातील माहिती आणि पाठविलेली सामग्री यांची संपादक मंडळाकडून पडताळणी केली जाईल.
५. नोंदणी झाल्यानंतर नवीन साहित्य पाठवताना अर्ज पुन्हा सादर करण्याची गरज नाही.
६. पूर्वप्रकाशित किंवा दुसऱ्या ठिकाणी प्रकाशित झालेले साहित्य पुन्हा प्रकाशित करण्याबाबत अंतिम निर्णय संपादक मंडळाकडे असेल.
७. लेखकांची नावे, त्यांची माहिती आणि प्रकाशित साहित्य यांचे दुवे/संदर्भ वेबसाईटवर ठेवले जातील.
८. नोंदणी, प्रकाशन, किंवा प्रकाशित साहित्य हटविणे याबाबतचे अंतिम निर्णय संपादक मंडळाचे असेल.
९. अधिक माहितीसाठी संपर्क पत्ता, इलेक्ट्रॉनिक पत्ता व दूरध्वनी क्रमांक उपलब्ध असतील.